चिमुकल्यांच्या निरोगी हास्यासाठी ईनरव्हिल क्लब ऑफ अपेक्सचा स्तुत्य उपक्रम
सटाणा :- समाजसेवेचा वसा जपत ईनरव्हिल क्लब ऑफ अपेक्स,सटाणा (डिस्ट ३०३)यांच्या वतीने सटाण्यातील पहिलीच स्थापन झालेली शाळा पी. एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सटाणा येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत दंतचिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये दंतचिकित्सक डॉ.सुमित पी.गुंजाळ (M.D.S.) व डॉ.यामिनी गुंजाळ (B.D.S.) ह्यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची स्वच्छता,योग्य ब्रशिंग पद्धत व दंत आरोग्याचे महत्त्व याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. लहान मुलांच्या दातांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक सल्लाही देण्यात आला.आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असताना,ईनरव्हिल क्लबने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.क्लबतर्फे ब्रश आणि पेस्ट चे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा जाधव,यांनी डॉक्टरांचे व ईनरव्हिल क्लबच्या सदस्यांचे आभार मानून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.प्रोजेक्ट हेड म्हणून अपर्णा येवलकर यांच्या अथक परिश्रम, नियोजन आणि समर्पणामुळे हा उपक्रम उल्लेखनीय यशस्वी ठरला.या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्षा प्रा.वर्षा शिरोडे,क्लब अध्यक्षा त्रिवेणी कुंवर,सचिव तृप्ती कुंवर, प्रोजेक्ट हेड अपर्णा येवलकर , माजी अध्यक्षा वंदना भामरे, डॉ.विद्या सोनवणे,सुवर्णा जंगम, पल्लवी बागड,आशा सोनवणे, दर्शना मेतकर,अल्का राणे,वंदना सोनवणे,कविता राजपूत,भावना देवरे,मालती चव्हाण तसेच, शाळेतील सहकारी गुंजाळ मॅडम,बालवाटिका शिक्षिका माधुरी मोरे,आदि उपस्थित होत्या."सेवा,मैत्री आणि समर्पण"या भावनेतून ईनरव्हिल क्लब ऑफ अपेक्स,सटाणा यांचा हा आरोग्यदायी उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
उपक्रम दरम्यान संस्थापक अध्यक्षा प्रा.वर्षा शिरोडे,यांनी ईनरव्हिल क्लबचा उद्दीष्टांची व कार्याची माहिती दिली.सुत्रसंचालन प्रोजेक्ट हेड अपर्णा येवलकर,यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्षा त्रिवेणी कुंवर, यांनी केले आणि आभार क्लब सचिव तृप्ती कुंवर,यांनी मानले.
0 टिप्पण्या