नाशिक - जिल्हा तलवारबाजी स्पर्धेत विजेता खेळाडूंना पारितोषिक वितरण

नाशिक :- नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने आयोजित सब-ज्युनिअर जिल्हा अजिंक्यपद तलवारबाजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कालिका देवी मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला. कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नितीन सुगंधी, आणि छत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे,यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :ईपी (Épée) मुली :
प्रथम – त्रिनवी महाजन
द्वितीय – विधिमा जगोटा
तृतीय – गौरी हेकरे, रेवा पाटील
फॉइल (Foil) मुली :
प्रथम – लब्धी मोदी
द्वितीय – अनन्या सुळे
तृतीय – आराध्या कुंभार, मोक्षिता केसकर
सेबर (Sabre) मुली :
प्रथम – शरण्ये डेरले
द्वितीय – अनघामाई
तृतीय – महिम शेख, सारा शिवाजी
फॉइल (Foil) मुले :
प्रथम – प्रणव डेरले
द्वितीय – शरयू यादव
तृतीय – चिरायू पाटील, अंकित पाटील
ईपी (Épée) मुले :
प्रथम – गुरुदीप पाटील
द्वितीय – विराट पाटील
तृतीय – अर्णव बनगर, अर्जुन कराड
सेबर (Sabre) मुले :
प्रथम – विधीत पवार
द्वितीय – शौर्य पाटील
तृतीय – हरी परदेशी, सनविन हिरे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या