प्रशासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुटखा माफियांची गय केली जाणार नाही - मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई :- छत्रपती संभाजीनगर येथे गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक गंभीर घटना घडली.या घटनेची तातडीने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,यांनी दखल घेत संबंधित महिला अधिकाऱ्यांशी थेट फोनवरून संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला.

मंत्री नरहरी झिरवाळ,यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत 'प्रशासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या गुटखा माफियांची गय केली जाणार नाही,'असा इशारा दिला.या प्रकरणातील दोषींवर आणि संबंधित गुटखा माफियांवर कठोरतम कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत.

मंत्री नरहरी झिरवाळ,यांनी अशा दबावतंत्राला बळी न पडता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे."कायदा सुव्यवस्था कायम राखत.जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही,"असे मंत्री नरहरी झिरवाळ स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या