(मालेगाव प्रतिनिधी)
मालेगाव :- नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावात मोठी कारवाई केली आहे.मालेगाव शहरात बेकायदेशीररित्या घातक शस्त्रे बाळगणाऱ्या ४ संशयित इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले असून,त्यांच्याकडून २ धारदार लोखंडी तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे चाईना मैदानात छापा दिनांक ७ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित तरुण धारदार व टोकदार तलवारी घेऊन फिरत असून, ते गंभीर गुण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने तातडीने रमजानपुरा हद्दीतील नूरनगरसमोरील 'चाईना मैदान' येथील मोकळ्या जागेत छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ४ संशयितांना वेढा घालून ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या सं.इसमांची नावे:१) मोहम्मद राशीन मोहम्मद मोबीन उर्फ पापा (वय २५ वर्षे, रा. गुलेशनगर, मालेगाव)२) मतीन खान साजीद खान तांबोळी (वय २० वर्षे, रा. गुलशने मालिक, पवारवाडी, मालेगाव)३) कासिम खान शब्बीर खान (वय २० वर्षे, रा. गुलशने इब्राहीम, डेपो, मालेगाव)
४) शेख आसिफ शेख यासीन (वय १९ वर्षे,रा.गोसियासनगर, रमजानपुरा, मालेगाव)
४) शेख आसिफ शेख यासीन (वय १९ वर्षे,रा.गोसियासनगर, रमजानपुरा, मालेगाव)
भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता,त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यासाठी आणलेल्या दोन धारदार व टोकदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या.आरोपींकडे या शस्त्रांचा कोणताही परवाना नव्हता. विनापरवाना व बेकायदेशीररित्या घातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी या चारही जणांविरुद्ध रमजानपुरा पोलीस ठाण्यात 'भारतीय हत्यार कायदा' (Arms Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई यापुढेही सुरू राहील,असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.
0 टिप्पण्या