जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता ७० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 


नागपूर :- जलसंपदा विभागातील एका वर्ग-१ च्या (Class 1 Officer) बड्या अधिकाऱ्याला ७० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. रविंद्र निळकंठराव वानखेडे (वय- अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ,जलसंपदा विभाग,नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
२५ लाखांच्या बिलासाठी मागितली लाच मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक नोंदणीकृत कंत्राटदार (Contractor) आहेत. त्यांनी भंडारा जिल्ह्यातील करजखेडा येथील १० लाख रुपये आणि नागपूर जिल्ह्यातील लखमापूर येथील १५ लाख रुपये अशा एकूण २५ लाख रुपयांच्या पाठबंधाऱ्यांच्या कामांची प्रलंबित बिले मंजुरीसाठी जलसंपदा विभाग, नागपूर येथे सादर केली होती.ही बिले मंजूर करून देण्यासाठी रंगेहाथ पकडण्यात आलेले अधीक्षक अभियंता रविंद्र वानखेडे,यांनी २ टक्के दराने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.कंत्राटदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी नागपूर एन्ट्री करप्शन ब्युरो (ACB) कडे रीतसर तक्रार नोंदवली. ७० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २१ मे २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली.तडजोडीअंती प्रलंबित बिलासाठी ५० हजार रुपये आणि भंडारा जिल्ह्यातील भुराटोला व नागपूरमधील खडकी मायनर येथील नवीन कामांची १० लाख रुपयांची निविदा मंजूर करून देण्यासाठी आणखी २० हजार रुपये,अशी एकूण ७० हजार रुपयांची लाच वानखेडे यांनी मागितली.कंत्राटदाराकडून ही ७० हजारांची लाच स्वतःच्या शासकीय कक्षात स्वीकारताना वानखेडे,यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.अंगझडतीत ३६ हजारांची रोकड जप्त कारवाई दरम्यान लोकसेवक अभियंता रविंद्र वानखेडे,यांची अंगझडती घेण्यात आली असता,त्यांच्याकडून लाचेच्या रक्कमेव्यतिरिक्त ३६,६३० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.याप्रकरणी नागपूर शहर येथील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान,अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर,अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतलेले अधिकारी व अंमलदार पोलीस उपअधीक्षक अनिल जिद्देवार,पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे,पोलीस अंमलदार व कर्मचारी म पो.हवा अस्मिता मेश्राम,करूणा सहारे,गिता चौधरी, पोहवा आशिष वैद्य,पोशि प्रफुल भातुलकर, होमेश्वर वाईलकर,वाहन चालक राजेंद्र जांभुळकर, आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या