अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी
:
नाशिक :- कर्तव्य बजावत असतांना प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्य शिबिर केवळ वैद्यकीय तपासणी नसून आपण आरोग्यासाठी वेळ दिल्याची आठवण आहे, असे प्रतिपादन नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरूणा मुगूटराव यांनी केले.
डॉ. वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, समता फाऊंडेशन मुंबई, एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर नाशिक आणि इंडियन डेंटल असोसिएशन, देवळाली, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी गर्भाशय कर्करोग, तोंडाचा कर्करोग व स्तन कर्करोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती मुगुटराव बोलत होत्या. यावेळी कारागृह सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अपर पोलीस महासंचलाक व महानिरीक्षक डॉ. सुहास वाळके, एच.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक येथील डॉ. योगेश तेलंग व डॉ. सुप्रिया जयस्वाल तसेच इंडियन डेंटल असोसिएशन, देवळाली-नाशिक येथील डॉ. किशोर मुळे, डॉ. रेणू मुळे, डॉ. श्रुती भांबरे, डॉ. प्राची देवरे आणि डॉ. स्नेहल भिरूड, अधिकारी व कर्मचारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते
शिबिर यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ तुरुंगाधिकारी (प्रशासन), नेहा गुजराथी, तुरुंगाधिकारी श्रेणी-२, श्रीमती डी. बी. बेडवाल, तुरुंगाधिकारी श्रेणी-२, श्रीमती एस. ए. हांडे, विकास जाधव, तुषार पाटील तसेच समता फाऊंडेशन, मुंबईचे प्रतिनिधी सचिन बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या