अहिल्यानगर :- गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल दोन लाख रुपयांची लाच मागून,तडजोडीअंती १ लाख रुपये स्वीकारण्याची संमती दर्शविणाऱ्या नगर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जयेश मोतीलाल गांगुर्डे,असे लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे (PSI) नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही धडक कारवाई केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांचे मामा आणि इतर १५ नातेवाईकांवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे ११ मे २०२६ रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे,हे करत होते.या प्रकरणात मदत करण्यासाठी गांगुर्डे यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १८ मे २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB),अहिल्यानगर येथे रीतसर तक्रार नोंदवली.तडजोडीअंती १ लाखाची मागणी तक्रारीची शहानिशा करण्यासाठी एसीबीच्या पथकाने १८ मे रोजीच पोलीस मुख्यालय,अहिल्यानगर येथे लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे,यांनी तक्रारदाराशी तडजोड करत २ लाख रुपयांऐवजी १ लाख रुपये लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली.लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशन,अहिल्यानगर येथे आरोपी जयेश गांगुर्डे,यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या अधिकाऱ्यांनी केली कारवाई ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे,आणि अहिल्यानगरचे पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे,यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक राजू आल्हाट,यांनी काम पाहिले,तर त्यांच्यासोबत पोलीस नाईक चंद्रकांत काळे,पोलीस कॉन्स्टेबल किशोर कुळधर,आणि शेखर वाघ, यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.
0 टिप्पण्या