पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू प्रकरणी मनपाची वारसांना नुकसान भरपाई

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- उद्यान विभागाच्या वतीने २७ वारसांना लाखांची आर्थिक मदत नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने सातपूर येथील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या परीवारातील ६ सदस्यांना २७ लाखांची आर्थिक मदत म्हणून नुकसान भरपाई देण्यात आली.महादेववाडी सातपूर येथे दि.११/०८/२०२५ रोजी धोकेदायक झाडांच्या फांद्या छाटणी करताना अपघाताची घटना घडली होती.या अपघातात ०५ व्यक्ती मृत्यूमुखी पडले होते व १ व्यक्ती जखमी झाली होते.त्यांच्या परिवारातील वारसांना उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग यांचे मार्फत मा.आयुक्त सो यांचे आदेशानुसार व महापौर हिमगौरी आहेर-आडके,उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या प्रयत्नातून व आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार परीवारातील ६ सदस्यांना २७ लाखांची आर्थिक मदत म्हणून धनादेशाद्वारे नुकसान भरपाई देणेत आली.यामध्ये लता दोभाडे यांना २.०० लाख रुपये,सचिन कैलास दोभाडे,लता कैलास दोभाडे,अक्षा सुरेश दोभाडे,श्रीअक्षा सुरेश दोभाडे, मंगल आंताराम हिंगमिरे या पाच वारसांना प्रत्येकी ५.०० लाख रुपयांची आर्थिक मदत म्हणून नुकसान भरपाई धनादेशाद्वारे देण्यात आली.यावेळी उद्यान अधीक्षक विवेक भदाने, नगरसेवक दिनकर पाटील,माजी नगरसेवक रवींद्र धिवरे तसेच सामजिक कार्यकर्ते अरुण काळे, उद्यान निरीक्षक भविष्या निकम,श्रीकांत इरणक, जगदीश लोखंडे व उद्यान विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी