या अनुषंगाने एकूण २१ प्राप्त प्रस्तावा पैकी १० कुटुंबांना प्रथम टप्प्यात प्रत्येकी रुपये ५० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.उर्वरित पात्र कुटुंबांना चालू आर्थिक वर्षात,टप्प्याटप्प्याने ही मदत वितरित करण्यात येणार आहे.सदर धनादेश माननीय महापौर श्रीमती हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते दि १६ एप्रिल २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.यावेळी उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिन्द्र सानप,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर,मुख्य वित्त व लेखा अधिकारी, दत्तात्रय पाथरूट,मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड,तसेच नाशिक महानगरपालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महापौर व उपमहापौर यांनी उपस्थितांना संबोधित करताना कोविड काळात महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अतुलनीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली तसेच महानगरपालिका त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहील,असा विश्वास दिला.कोविड महामारीच्या अत्यंत कठीण काळात महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्या या अतुलनीय सेवेला आणि बलिदानाला मानाचा मुजरा म्हणून नाशिक महानगरपालिका त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.ही आर्थिक मदत केवळ सहाय्य नसून, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल आहे. महानगरपालिका प्रशासन भविष्यातही अशा कुटुंबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहील असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.आयुक्त मनिषा खत्री,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन व प्रदीप चौधरी तसेच तत्कालीन अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर,यांच्या मार्गदर्शनाखाली हि संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली असून,संबंधित कुटूंबाना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रशासनाने विशेष प्रयन्त केले.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय देवकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
0 टिप्पण्या