दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी परराज्यातून ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

मालेगावातील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी उत्तर प्रदेश राज्यातून जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मालेगाव :- दिनांक ०८/०४/२०२६ रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०२६, भा.न्या.सं. कलम १०३(१), १०९, ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यातील मयत १) निखिल भोला सहानी (वय १८) व २) अनिश उर्फ गालू भोला सहानी (वय २८, दोघे रा. अयोध्या नगर,सोयगाव, मालेगाव; मूळ रा.गोरखपूर, उत्तर प्रदेश) अशा दोघांना आरोपी मोहम्मद रजा आणि ऑन अब्बास उर्फ ऑन भाई (रा. हल्लोर, सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांनी पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद घालून धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारले होते.सदर घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू,सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सिद्धार्थ बारवाल,सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग दर्शन दुगड यांनी तात्काळ दखल घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांना सूचना दिल्या होत्या.गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पलायन केले होते.मालेगाव व मनमाड परिसरात त्यांचा शोध घेतला असता,ते उत्तर प्रदेश राज्यात गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात तपासासाठी रवाना करण्यात आले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज तालुक्यात सतत दोन दिवस रात्रंदिवस पाळत ठेवून हल्लोर शिवारातून खालील आरोपींतांना शिताफीने ताब्यात घेतले:


१) रजा कैसर अब्बास (वय १९, रा. हल्लोर, ता. डुमरियागंज, जि. सिद्धार्थनगर, राज्य उत्तर प्रदेश)
२) ऑन मंजूर अब्बास उर्फ ऑन भाई (वय २०, रा. हल्लोर,ता.डुमरियागंज,जि.सिद्धार्थनगर, राज्य उत्तर प्रदेश)

सदर आरोपींना गुन्ह्याच्या तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता,त्यांनी दोघांनी मिळून पैशांच्या वादावरून निखिल सहानी व अनिश सहानी यांना धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारल्याची कबुली दिली आहे.दोन्ही आरोपींना मालेगाव छावणी पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, माननीय न्यायालयाने त्यांची ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव व स.पो.नि.योगेश पाटील हे करीत आहेत.ही कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, सहा.पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल,सहा.पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे,पो.उ.नि.दत्ता कांभिरे,पोलीस अंमलदार श्याम पवार,शरद मोगल,योगेश कोळी,विशाल गोसावी,सचिन वराडे,नरेंद्र कोळी,संदीप राठोड.मालेगाव छावणी पो.नि. दीपक जाधव, स.पो.नि.योगेश पाटील.तांत्रिक विभाग पो.ह. हेमंत गिलबिले,प्रदीप बहिरम,नितीन गांगुर्डे.यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी