शहरात चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद दहा गुन्हे उघडकीस



मालेगाव शहरात चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद
चेन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
मालेगाव :- छावणी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०१/०३/२०२६ रोजी दुपारच्या सुमारास सटाणा नाका परिसरात एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याच्या धातूची पोत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलवर भरधाव वेगाने येऊन,हिसकावून चोरून नेली होती.याप्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५५/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर घटनेप्रमाणेच गेल्या काही महिन्यांमध्ये मालेगाव शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यांवर पाळत ठेवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, व अपर पोलीस अधीक्षक  तेगबीर सिंह संधू यांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांना सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या पथकातील अंमलदारांनी मालेगाव शहरात येण्या-जाण्याचे सर्व रस्ते तसेच चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांच्या घटनास्थळांवरील उपलब्ध असलेले सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पडताळणी केली. तसेच तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करून,आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलबाबत गोपनीय माहिती मिळवली.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यातील आरोपी हे कर्नाटक राज्यातील बिदर शहरात सध्या वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यावरून पोलीस पथकाने कर्नाटक राज्यातील बिदर शहरात गांधीगंज हद्दीतील इराणी मोहल्ल्यामध्ये सतत ५ दिवस पाळत ठेवून स्थानिक पोलिसांच्या मदतीने खालील आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले:

१) मुस्तफा अली इझा अली (वय २० वर्ष, रा. भुसावळ, खडका रोड, इराणी मोहल्ला, जि. जळगाव; हल्ली मुक्काम: इराणी मोहल्ला, बिदर, ता. जि. बिदर, राज्य कर्नाटक).वरील आरोपीत मुस्तफा अली यास चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांबाबत विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता,त्याने आणि त्याच्या साथीदारांनी [२) सादिक अली इबादत अली (रा. भुसावळ), ३) भोला सज्जाद अली (रा. भोपाळ, मध्य प्रदेश), ४) अब्बास अली इबादत अली (रा. भुसावळ), ५) (पूर्ण नाव माहित नाही, रा. श्रीरामपूर,जि.अहिल्यानगर)] मालेगाव शहरात मागील काही महिन्यांमध्ये वेळोवेळी येऊन मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून चोरी केल्याची कबुली दिली आहे.ताब्यात घेतलेला आरोपी क्र.१मुस्तफा अली याने दिलेल्या कबुलीवरून मालेगाव शहर हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले चेन स्नॅचिंगचे एकूण १० गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे:

१. मालेगाव छावणी पो.स्टे. गु.र.नं. ५५/२०२६
२. मालेगाव छावणी पो.स्टे. गु.र.नं. ६२/२०२६
३. मालेगाव छावणी पो.स्टे. गु.र.नं. १६०/२०२५
४. मालेगाव छावणी पो.स्टे. गु.र.नं. ४४/२०२५
५. मालेगाव छावणी पो.स्टे. गु.र.नं. ४५/२०२५
६. मालेगाव छावणी पो.स्टे. गु.र.नं. १८५/२०२५
७. मालेगाव कॅम्प पो.स्टे. गु.र.नं. २११/२०२५
८. मालेगाव कॅम्प पो.स्टे. गु.र.नं. २२८/२०२५
९. मालेगाव कॅम्प पो.स्टे. गु.र.नं. ३८/२०२६
१०. येवला तालुका पो.स्टे. गु.र.नं. ५४/२०२६

यातील सर्व आरोपी हे चेन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार असून ते महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार आहेत.सदर आरोपींनी मालेगाव शहरात गुन्हे करताना रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) कंपनीची हंटर (Hunter) आणि बजाज (Bajaj) कंपनीची पल्सर एन.एस. (Pulsar NS) अशा मोटारसायकली वापरल्याचे उघडकीस आले आहे. 

ताब्यात घेतलेला आरोपी मुस्तफा अली याच्या इतर साथीदारांचा पोलीस पथक कसून शोध घेत असून, त्यांच्याकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मुस्तफा अली याला छावणी पोलीस ठाण्याकडील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सिद्धार्थ बारवाल,सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग  दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस अंमलदार श्याम पवार,शरद मोगल, विशाल गोसावी,सचिन वराडे,नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी,संदिप राठोड,तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदार दिनेश शेरावते,सचिन बेदाडे,राकेश जाधव,राम निसाळ,आणि तांत्रिक विभागाचे पो.ह.हेमंत गिलबिले,प्रदिप बहिरम,नितीन गांगुर्डे,यांच्या पथकाने वरीलप्रमाणे चेन स्नॅचिंगचे १० गुन्हे उघडकीस आणून ही कामगिरी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी