महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने विशेष चित्ररथ
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन
भिडे वाड्याची प्रतिकृती असलेल्या चित्ररथाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
महात्मा फुले हे नेशन बिल्डर होते - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.११ एप्रिल:- शिक्षण,शेती यासह सामाजिक समता प्रस्थापित करत संपर्ण राष्ट्र उभे करण्याचे काम महात्मा जोतीराव फुले यांनी केले. ते खऱ्या अर्थाने नेशन बिल्डर होते,असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले नाका येथील फुले स्मारकात मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.तसेच यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भिडे वाड्याची प्रतिकृती असलेल्या चित्ररथाचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,आमदार हिरामण खोसकर,माजी आमदार वसंत गीते, डॉ.शेफाली भुजबळ,जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे,गटनेत्या सीमा ठाकरे,भगुरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे,नगरसेवक दिनकर पाटील,नगरसेवक किरण राजवाडे,नगरसेवक ज्योती गांगुर्डे,नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर, नगरसेविका कविता नाईक,नगरसेवक प्रथमेश गीते,नगरसेवक अमोल पाटील,गोरख बोडके, समाधान जेजुरकर,अंबादास खैरे,बाजीराव तिडके,प्रा.ज्ञानेश्वर दराडे,शंकर मोकळ,शरद मंडलिक,शंतनु शिंदे,आशा भंदुरे,योगिता आहेर, तेजश्री काठे,योगेश कमोद,शशी हिरवे,पांडुरंग राऊत,मंगला जाधव,मोहन माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त वर्षभर विविध उपक्रम साजरे करण्यात येणार आहे.आज दिल्लीतील संसद भवनाच्या परिसरात महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याठिकाणी आज देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान यासह मान्यवरांनी अभिवादन केले.त्यांच्या या द्विशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.आपण सर्वांनी वर्षभर गोर गरीब वंचित घटकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवावे असे आवाहन त्यांनी केले.ते म्हणाले की,११एप्रिल रोजी ही जन्मतारीख शोधण्याचे काम प्रा. हरी नरके यांनी केले.तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे मूळ चित्र त्यांनी शोधून काढले. त्यानंतर शासनाने त्यावर शिक्कामोर्तब करून प्रसिद्ध करण्यात आले. महात्मा फुले यांचे साहित्य समाजापर्यंत आणण्यासाठी देखील त्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की,महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य बहुजन समाजाला शिक्षित करणे हेच होते. त्याच विचारातून खानवडी येथे उभारलेली ही आधुनिक सीबीएसई शाळा ही त्यांच्या कार्याची पुढची पायरी आहे.महात्मा फुले हे ‘नेशन बिल्डर’होते तसेच अंधश्रद्धा आणि ब्राह्मण्यवादी प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे विचारवंत होते. त्यांच्या कार्यात विविध समाजघटकांनी सहभाग घेतला होता.महात्मा फुले ब्राम्हण विरोधी होते असं विपर्यस्त चित्रण केलं गेलेलं आहे.जोतीरावांच्या ब्राह्मण समाजाविषयीच्या लेखनाचा सोयिस्करपणे वापर करण्यात आलेला आहे.वास्तवात फुलेंचा विरोध ब्राम्हण व्यक्तीला-जातीला नव्हता तर ब्राम्हण्यवादाला होता हे लक्ष्यात घ्यावे.जोतीरावांचे कितीतरी आप्तमित्र आणि सहकारी ब्राह्मण होते.त्यात भांडारकर,सदाशिव गोवंडे, भिडे,वाळवेकर,केशवराव भवाळकर, सखाराम परांजपे,मोरो विठ्ठल वाळवेकर,तुकाराम पडवळ,दादोबा तरखडकर कृष्णशास्त्री चिपळूणकर,हरीरावजी चिपळूणकर,न्या.रानडे, लोकहितवादी अशा अनेकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
भिडे वाड्याची प्रतिकृती असलेल्या चित्ररथाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून भिडे वाड्याची प्रतिकृती असलेला चित्ररथ तयार करण्यात आला आहे.या चित्ररथाचे आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.संपूर्ण मिरवणुकीत हा चित्ररथ प्रमुख आकर्षण ठरला.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार आहे. त्यामाध्यमातून हा चित्ररथ राज्यभरात फिरणार असून महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी काम करणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा