गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची - राजेश गाडगीळ
नाशिक :- गिर्यारोहणात सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे.अपघात कमी करण्या साठी जागरूकता आणि योग्य प्रशिक्षण खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ञ राजेश गाडगीळ,यांनी केले.सातपूर येथील नॅब सभागृहात नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यूअर संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देणाऱ्यांचा कृतज्ञता सोहळ्या प्रसंगी राजेश गाडगीळ,बोलत होते ते म्हणाले की गिर्यारोहकांना पर्वतांच्या भौगोलिक परिस्थिती,हवामान,आणि शारीरिक शक्ती याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.अर्धवट माहितीच्या जोरावर चुकीच्या आत्मविश्वासामुळे सध्या गिर्यारोहण क्षेत्रात अपघातांचे प्रमाण वाढले प्रमाण घटविण्यासाठी प्रत्येकाने जनजागृती करणे गरजेचे आहे.असे मार्गदर्शन केले.संस्थेला तांत्रिक साहित्य भेट देऊन सहकार्य केलेले प्रमुख अतिथी नंदू चव्हाण, भगवान चवले,भरत वखारिया,संजय अमृतकर आदींचा संस्थेच्या वतीने सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करून चर्चासत्रा प्रसंगी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितितां मधील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता ऋतिक मारणे,याचा सत्कार करण्यात आला या चर्चासत्राचे सूत्रसंचालन तेजस बस्ते, यांनी केले.उपस्थित नवोदित गिर्यारोहकांनी व हौशी पर्वतारोहण करणाऱ्यांना प्रमुख अतिथींनी सखोल मार्गदर्शन,करतांना अनुभव कथन केले. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष दयानंद कोळी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत संस्थेचे किरण वाघचौरे, निलेश पवार,यांनी केले.सूत्रसंचालन कोळी यांनी केले.आभार मुकुल वांद्रे,यांनी मानले.यावेळी गिर्यारोहक क्षेत्रातील गिर्यारोहक यांच्यासह प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.समारोप सह्याद्रीच्या ऋणात राहून करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा