नाशिक :- दिनांक २०/०२/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालखेड एमआयडीसी परिसरात असलेल्या एम.आय.टी.सी. रोलिंग मिल प्रा. लि. कंपनीच्या बाहेर पार्किंगमध्ये एक टोळी सक्रिय होती.स्टील (आसरी) वाहतूक करणाऱ्या ट्रेलरचे चालक एकमेकांशी संगनमत करून, अंधाराचा फायदा घेऊन एका ट्रेलरमधून दुसऱ्या ट्रेलरमध्ये स्टील काढून ते काळ्या बाजारात विक्री करण्याच्या तयारीत होते.माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार या ठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले.एम.आय.टी.सी. रोलिंग मिल कंपनीच्या बाहेरील मोकळ्या जागेत छापा टाकून खालील इसमांना ताब्यात घेण्यात आले:
ताब्यात घेतलेले आरोपी:
१) अझरुद्दीन सादीक शेख (वय ३६, रा. नानावली, जुने नाशिक)
२) अरुण गणपत खांदवे (वय ३८, रा. ऋषीदास सोसायटी,कलानगर, म्हसरूळ,नाशिक)
३) अमर घाडगे (रा.भराडवाडी, दिंडोरी, जि. नाशिक - फरार)
४) वकार सगीर अहमद (वय २५, रा. गोपालपूर, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश - चालक)
५) हरेंद्र बळीराम यादव (वय २७, रा. मिलनखुर्द, जि. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश - चालक)
६) अर्शाद इम्तियाज अली (वय २२, रा. पजराबेर, जि. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश - चालक)
७) तबराक मोहम्मद सजीर हुसेन (वय ४०, रा. जामदी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश - चालक)
८) मोहम्मद अझहर अहमद इलियास (वय २२, रा. सदुनिया, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश - चालक)
९) ट्रेलर क्रमांक NL 01 AA 2667 चा चालक (नाव गाव माहित नाही - फरार)
जप्त केलेला मुद्देमाल:
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
०६ ट्रेलर: ८ ते ३२ mm आकाराच्या लोखंडी सळयांसह.
०१ मारुती ८०० कार.
०७ मोबाईल हँडसेट.
रोख रक्कम: १,०९,५००/- रुपये.
वाहनांची कागदपत्रे.
एकूण जप्त किंमत: २,७८,१७,५७०/- रुपये (दोन कोटी ७८ लाख १७ हजार ५७० रुपये).
याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर,सपोनि नितीन रणदिवे, पोलीस अंमलदार सचिन धारणकर,प्रीतम लोखंडे,धनंजय शिलावटे,गिरीश निकुंभ,बापूराव पारखे,विश्वनाथ धारबळे,संदीप नागपुरे,माधव साळे,हेमंत गिलबिले,प्रदीप बहीरम आणि नितीन गांगुर्डे,यांच्या पथकाने केली आहे.
0 टिप्पण्या