नाशिक :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने आज ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ईश्वर प्रतिष्ठा–२, श्री. श्री.रविशंकर मार्ग,अपोलो फार्मसी शेजारी, नाशिक येथे एक महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली.या बैठकीस नागरिक,ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. शिवजन्मोत्सव सोहळा अधिक भव्य,शिस्तबद्ध व यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून व आशीर्वाद घेऊन करण्यात आली.याप्रसंगी शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात आल्या.अध्यक्ष अजिंक्य बाळा वाढणे,उपाध्यक्ष प्रवेन घोलु गवारे,कार्याध्यक्ष साहिल पाटील, खजिनदार महेश पाटील, सरचिटणीस संदीप बोराडे,ऋषीकेश चव्हाण,यांची एकमताने निवड करण्यात आली.तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.नियोजन, जबाबदाऱ्या वाटप व समन्वय यावर विशेष भर देण्यात आला.उपस्थित सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.मोठ्या प्रमाणातील उपस्थिती व उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बैठक यशस्वी ठरली असून,येणारा शिवजन्मोत्सव सोहळा अधिक जोशात, उत्साहात व जल्लोषात साजरा होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
0 टिप्पण्या