अग्नीतून तावून सुलाखून घडलेले - भविष्यसज्ज दल


नवी दिल्ली :- परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक यांनी सन्मानित, दक्षिण कमांड चे कमांडीग इन चीफ जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी त्रिशूल सरावांतर्गत त्रिसेवा आराखड्याच्या माध्यमातून थरच्या वाळवंटात आयोजित करण्यात आलेल्या मरुज्वाला सरावादरम्यान सुदर्शनचक्र कॉर्प्स आणि शाहबाज तुकडीच्या परिचालनात्मक तयारीचा आढावा घेतला.हा सराव म्हणजे अत्याधुनिक उपकरणे आणि स्वदेशी पद्धतीने निर्मित ड्रोन्स व ड्रोन-विरोधी प्रणालींचा सहभाग असलेल्या नाविन्यपूर्ण रणनीती, तंत्रे तसेच पद्धती (टीटीपीज) यांचे प्रमाणीकरण करण्याचा प्रयत्न होता.वाळवंटी प्रदेशात वास्तविक युध्द स्थितीमध्ये यांत्रिकी तसेच पायदळ विभाग, थररॅ्पटॉर्स आणि भारतीय हवाई दलाची वैमानिकी मालमत्ता यांच्यासह सर्व संबंधित शाखांच्या लढाऊ डावपेचांचा या सरावात समावेश होता.आर्मी कमांडरांनी सहभागी तुकड्यांशी संवाद साधला आणि सुदर्शनचक्र कॉर्प्सच्या सर्व श्रेणींतील जवानांचे तसेच दक्षिणी कमांडच्या सर्व सहभागी रचना आणि युनिट्स, हवाई दले आणि भारतीय हवाई दले यामधील जवानांची त्यांची व्यावसायिकता, चापल्य तसेच परिचालनात्मक उत्कृष्टता याबद्दल प्रशंसा केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी