ऑपरेशन सिंदुर राबविणाऱ्या भारतीय सैन्याला, शंखनादातून मानवंदना


नाशिक इंदिरानगर :- भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचा यशाबद्दल आम्हा सर्व भारतीयांना आपल्या सैन्य दलांचा, आपल्या सैनिकांचा अभिमान आहे. त्यांच्या या यशाचा यशोत्सव साजरा करण्यासाठी गुणगौरव न्यास संचलित अनंतविजय शंखनाद पथकने आपल्या सैन्य दलाला शंखवादनातून मानवंदना.दिली.
विजयाचा शंखनाद ही आपली परंपरा आहेच आणि म्हणूनच एक भारतीय म्हणून मोठ्या प्रमाणात मान्यवर नागरिक व अनंत विजय शंख नाद पथकाचे सदस्य सहभागी झाले होते.
यावेळी  विजय साने, अजिंक्य साने, सचिन कुलकर्णी, दिपाली कुलकर्णी, वृषाली घोलप, मंगेश जोशी, संजय करंदीकर, प्रल्हाद माशाळकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या