दि.19जानेवारी रोजी सायंकाळी सदर उपक्रमाचे समारोह सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर गुरुजी रुग्णालयचे प्रकाश पाठक, अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान,वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना, मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल,कौशल घोडके, शिक्षण अधिकारी बी.टी. पाटील,कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लोणारी,नितीन ठाकरे,ईश्वर चव्हाण,कवयित्री अलका कुलकर्णी,नंदकिशोर ठोंबरे, कवी डॉ. चिदानंद फाळके विनायक रानडे ,या समवेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष माननीय ल .जि. उगांवकर , सचिव गोपाळ पाटील, सहसचिव डॉ.अंजली पाटील,संचालक छाया निखाडे,अनिल भंडारी, अजय ब्रम्हेचा,परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी तसेच विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार, व कल्पना चव्हाण, यांनी आपल्या केले.
0 टिप्पण्या