मुंबई, 3 सप्टेंबर 2024 :- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विपणन आणि निरीक्षण संचालनालय (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार), नाशिक उपकार्यालयातील वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. विपणन आणि निरीक्षण संचालनालयाच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली आहे. कंपनीने उत्पादित केलेल्या 'गोवर्धन तूप' ब्रँडसाठी ऍगमार्क परवाना देण्याच्या बदल्यात अधिकारी एक लाख रुपयांची मागणी करत अवाजवी फायदा घेत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. सीबीआयने यशस्वी सापळा रचून वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले. त्यानंतर त्याला अटक करून नाशिकमधील सीबीआय प्रकरणातील विशेष न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या अधिकाऱ्याला 5 सप्टेंबर 2024 पर्यंत सीबीआय पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपासात आरोपीच्या निवासी आणि कार्यालय परिसरात झडती घेतली असता दोषारोपासंदर्भातली कागदपत्रे उघडकीस आली. सीबीआय या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
प्रसिद्धी प्रमुख न्यूज ला वार्ताहर प्रतिनिधी पाहिजेत
PRASIDDHI PRAMUKH
Translate
जाहिरात संदर्भात महत्त्वाची सूचना
"या न्यूज पोर्टलवर (prasidhipramukh.in) प्रदर्शित होणाऱ्या सर्व जाहिरातींमधील मजकूर, दावे आणि माहितीची जबाबदारी संबंधित जाहिरातदाराची असेल. संपादक किंवा प्रकाशक या जाहिरातींमधील कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाहीत. वाचकांनी कोणत्याही उत्पादनाची किंवा सेवेची खरेदी करण्यापूर्वी स्वतः योग्य ती शहानिशा करावी.जाहिरातींच्या माध्यमातून होणाऱ्या कोणत्याही व्यवहारासाठी हे न्यूज पोर्टल जबाबदार राहणार नाही".
0 टिप्पण्या