कुंभमेळा नियोजन: नाशिक ग्रामीण पोलिसांना 'अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे सुरक्षेसाठी बॅरिकेड्स!


सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पुढाकार; नागरिकांच्या आरोग्यासाठीही हॉस्पिटलचे विविध उपक्रम

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन आणि सार्वजनिक व्यवस्थापनासाठी सहकार्य म्हणून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP)  सुनील रोहोकले यांच्याकडे बॅरिकेड्स सुपूर्द करण्यात आले. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आणि सार्वजनिक आयोजनाच्या नियोजनात पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने हॉस्पिटलने हा पुढाकार घेतला आहे.

कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असते.अशा वेळी गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विविध साधनांची आवश्यकता असते.या पार्श्वभूमीवर बॅरिकेड्स उपलब्ध करून देऊन अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे. हा उपक्रम हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीचा आणि शहर व परिसराच्या सार्वजनिक हितासाठी सहकार्य करण्याच्या भूमिकेचा एक भाग आहे.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे केवळ आरोग्यसेवा पुरविण्यापुरते मर्यादित न राहता, नाशिक शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते.आरोग्य तपासणी शिबिरे, आरोग्यविषयक जनजागृती,विविध आजारांबाबत मार्गदर्शन आणि सामाजिक आरोग्य उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हॉस्पिटल प्रयत्नशील आहे. आरोग्यसेवेच्या पलीकडे जाऊन समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणे आणि प्रशासनाच्या लोकहिताच्या उपक्रमांना सहकार्य करणे, ही हॉस्पिटलच्या सामाजिक बांधिलकीची महत्त्वाची बाजू आहे.अनुप त्रिपाठी,सेंटर हेड,अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी सांगितले की, “नाशिक शहर आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य व कल्याण यांना आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. आगामी कुंभमेळा हा प्रशासन आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम असून,त्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करता येत असल्याचा आम्हाला आनंद आहे. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा, जनजागृती आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यापुढेही समाजाच्या गरजांनुसार विविध उपक्रमांतून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत राहील.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या