Malegaon - सरकारी कार्यालयेही सुरक्षित नाहीत! महापालिका उपकेंद्रात धाडसी घरफोडी,वाचा काय घडलं?

मालेगावात महापालिका आरोग्य उपकेंद्रात घरफोडी; सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल लंपास


मालेगाव नाशिक :- येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या नयापुरा उपकेंद्र कार्यालय (प्रभाग ३) येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे.चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी संगणक आणि वैद्यकीय साहित्यासह एकूण ३९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
सुटीच्या काळात झाली चोरी
मिळालेल्या माहितीनुसार,ही चोरी २३ मे (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपासून ते २५ मे (सोमवार) सकाळी १० वाजेच्या दरम्यान झाली.कार्यालयाला सुटी असल्याने चोरट्यांनी या वेळेचा फायदा घेतला.२६ मे रोजी या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कार्यालयातील बहुउद्देशीय कर्मचारी रोहन साहेबराव पाटील (वय २२) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलीस अहवालानुसार चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे.

संगणक व इतर साहित्य: ३०,००० रुपये,वैद्यकीय साहित्य व औषधे: १३,००० रुपये,इंडक्शन शेगडी व स्टेबिलायझर: २,००० रुपये,रोख रक्कम (प्रिंटिंगचे पैसे): ८०० रुपये पोलीस तपास सुरू या घटनेची माहिती मिळताच मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०५ आणि ३३१ (४) नुसार घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खैरनार करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या