(नाशिक प्रतिनिधी)
नाशिक :- तालुका पोलीस ठाणे हद्दीतून ७५ हजार रुपये किमतीच्या १५ शेळ्यांची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्यांनी पांढऱ्या रंगाच्या 'डिझायर'कारमधून येऊन ही चोरी केली. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे.घटनास्थळ: सैय्यद पिंप्री शिवार, निशांत हॉटेल समोर, ता. जि. नाशिक. चोरीला गेलेला माल: ७५,००० रुपये किमतीच्या १५ गाभण/मोठ्या शेळ्या (काळ्या-पांढऱ्या रंगाच्या).चोरीची वेळ: २५ मे २०२६ रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या सैय्यद पिंप्री शिवारातून एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. निशांत हॉटेल समोर राहणारे विलास शिवाजी वैने (वय ३७) हे शेळीपालनाचा व्यवसाय करतात. २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेडवर डल्ला मारला.चोरट्यांनी शेडची लोखंडी जाळी कापून आत प्रवेश केला.शेडमध्ये बांधलेल्या ७५ हजार रुपये किमतीच्या एकूण १५ काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या.या शेळ्यांचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते.पांढऱ्या कारमधून आले होते चोर मिळालेल्या माहितीनुसार,चोरटे पांढऱ्या रंगाच्या 'डिझायर'कारमधून आले होते. त्यांनी सर्व शेळ्या गाडीत कोंडल्या आणि फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने तिथून पळ काढला.२६ मे रोजी या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली.पोलिस तपास सुरू
फिर्यादी विलास वैने यांच्या तक्रारीवरून नाशिक तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सपोउनी) अहिरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
0 टिप्पण्या