नाशिक मधील सिद्धेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न
नाशिक :-जुने नाशिक येथील श्री स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.या मंगलप्रसंगी महारष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. उपस्थित सर्व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवान महादेवांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. जुने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवचैतन्य देणारा हा सोहळा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याला महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.देवयानी फरांदे आमदार विक्रांत पाटील भारतीय जनता पक्ष शहराध्यक्ष सुनील केदार,गटनेते शाम बडोदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार,नगरसेवक चंद्रकांत खोडे,नगरसेविका स्वाती भामरे,नगरसेविका रुपाली निकुळे,सचिन मराठे,मंगला नन्नावरे,बबलू शेलार,मा.नगरसेवक सुनिल खोडे,हिंदू एकता आंदोलन चे रामसिंग भाऊ बावरी,राजेंद्र अहिरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा