पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा रुग्णालयातील जळीत रुग्ण कक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

इमेज
नाशिक :- जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून शासकीय जिल्हा रुग्णालयात साकारण्यात आलेल्या विस्तारीत जळीत रुग्ण कक्ष टप्पा क्रमांक एक चे लोकार्पण राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर,उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीश शिंपी,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक अति दक्षता विभाग, आपत्कालिन कक्ष व आहार विभागास भेट दिली.यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांना मिळणाऱ्या आहाराविषयी माहिती घेतली.  जिल्हा रुग्णालयातील या अत्याधुनिक जळीत रुग्ण कक्षामुळे गंभीर जळीत रुग्णांना  सुरक्षित, स्वच्छ व उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या मॉड्यूलर जळीत रुग्ण कक्षात संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक सामग्री, 5 खाटा, स्वतंत्र...

महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक महापालिकेत महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास आयुक्त अमित रंजन,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, पूर्व प्रभाग सभापती मंगला नन्नावरे,पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेविका जागृती गांगुर्डे, नगरसेवक राजेंद्र आहेर, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर,नितीन पवार,अजित निकत,सुवर्णा दखणे,संगीता नांदुरकर,सहाय्यक आयुक्त रमेश बहिरम,मुख्य लेखापरीक्षक बळवंत गायकवाड,शहर अभियंता संजय अग्रवाल,अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत,रवींद्र धारणकर,मैंद,मिळकत व्यवस्थापक नितीन राऊत,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड,उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,शिक्षण प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी,सिटी लिंक मुख्य लेखाधिकारी सुरेखा जाधव,कार्यकारी अभियंता सचिन जाधव,जितेंद्र पाटोळे...