मनपाच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मनपा मुख्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे,साहेबराव भोसले लिंगायत गवळी समाजाचे प्रतिनिधी गणेश भोरे,उमेश आटवणे,अनिल कोठुळे,सुधीर भुसारे,शामराव दरेकर,डॉ.प्रदीप गोंधळे,प्रकाश किल्ले, मोहन आवटे,संतोष घोडके आदींसह सुरक्षारक्षक बी.के.पवार,अशोक कोरडे,कदम,यांच्यासह अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.महात्मा बसवेश्वर यांचे सामाजिक परिवर्तनासाठी मोठे योगदान महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात मोठं योगदान आहे.स्त्री दास्यत्व नाहिसे करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्यांचे कार्य मोठे होते त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी या प्रसंगी केले.यावेळी लिंगायत गवळी समाजाचे वतीने सुधीर भुसारे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा