उन्हाळ्यात किडनी स्टोनचा वाढता धोका; वेळेवर तपासणी अत्यावश्यक - डॉ. श्याम तलरेजा यांचा इशारा
नाशिक :- उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊन किडनी स्टोन (मूत्रपिंडातील खडे) होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील युरोलॉजिस्ट डॉ.श्याम तलरेजा यांनी दिला आहे.अनेकदा किडनी स्टोनची समस्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे न दर्शवता विकसित होत असल्याने वेळेवर तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.डॉ. तलरेजा यांनी सांगितले की,उष्ण हवामानामुळे शरीरातून घामाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते.परिणामी मूत्राचे प्रमाण कमी होते आणि खनिजे साचून किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते.सुरुवातीला कोणताही त्रास जाणवत नसला तरी पुढील टप्प्यात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ,मळमळ, उलट्या किंवा लघवीत रक्त दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी किडनीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये किडनी स्टोनच्या निदानासाठी विशेष चेक-अप पॅकेज उपलब्ध असून,त्यामध्ये युरोलॉजिस्ट सल्लामसलत,सोनोग्राफी (USG), युरिक ऍसिड तपासणी तसेच किडनीसंबंधित रक्त तपासण्या समाविष्ट आहेत. याशिवाय,रुग्णांच्या सोयीसाठी अवघ्या ₹५०० मध्ये सोनोग्राफी व तज्ज्ञ सल्लामसलत अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे लवकर निदान करणे अधिक सुलभ झाले आहे.किडनी स्टोनच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक होल्मियम लेसर तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया उपलब्ध असून, हे उपचार ₹३५,००० ते ₹६०,००० या परवडणाऱ्या दरात केले जातात. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायक ठरते, तसेच रुग्णांचा पुनर्वसन कालावधीही कमी होतो.तसेच, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र रुग्णांसाठी किडनी स्टोन, लघवीच्या नळीतील स्टोन तसेच प्रोस्टेट ग्रंथीवरील शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत,ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळत आहे.याबाबत बोलताना डॉ.श्याम तलरेजा म्हणाले,
“किडनी स्टोन ही समस्या अनेकदा शांतपणे वाढत असते. लक्षणे दिसेपर्यंत ती गंभीर होऊ शकते.त्यामुळे ‘तपासणी हाच सर्वोत्तम उपाय’ आहे.वेळेवर निदान केल्यास उपचार अधिक सोपे,सुरक्षित आणि परिणामकारक होतात.”नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे,संतुलित आहार घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे याकडे विशेष लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली किडनी स्टोनचे अचूक निदान व प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा