विल्होळी येथील प्राणघातक हल्ल्यातील संशयित दांपत्यास अटक


दिनांक १३/०४/२०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विल्होळी गावाच्या शिवारात सुरजकुमार मोहनलाल सोलंकी (जैन) (रा. अमरधाम रोड, नानावली, जुने नाशिक) याला एका अज्ञात महिला व पुरुषाने मोबाईलवर झालेल्या बोलचालीच्या कारणावरून, हातातील लोखंडी कोयत्याने व दगडाने सुरजकुमारच्या दोन्ही हातांवर,मानेवर आणि डोक्याच्या पाठीमागच्या बाजूस गंभीर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर संशयित महिला व पुरुष अज्ञात स्थळी फरार झाले होते.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस पथकांना आरोपींच्या शोधासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. तसेच या घटनेच्या अनुषंगाने विभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक  दत्तात्रय शिंदे, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक  मृदुला नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची बारकाईने पाहणी केली.जखमी सुरज सोलंकी याच्या दैनंदिन कामकाजाची,पूर्व इतिहासाची आणि सध्याच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवली असता,त्याचे अलीकडच्या काळात एका महिलेशी वाद असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे तपास केला असता,ती महिला व तिचा पती घटनेपासून फरार असल्याचे समजले.शोध घेतला असता त्यांना नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील एका खेड्यातून ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेले आरोपीत
१)हनुमंत अण्णासाहेब शिंदे (वय ४२, रा. अंधापुरी, ता. पाथरी, जि. परभणी; हल्ली रा. विठाई नगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठ रोड, नाशिक).
२)साधना हनुमंत शिंदे (वय ३७, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर; हल्ली रा.विठाई नगर, नामको हॉस्पिटलच्या मागे,पेठ रोड, नाशिक).

घटनेचे कारण
महिला आरोपी साधना शिंदे हिची सखोल चौकशी केली असता,जखमी सुरज सोलंकी व साधना यांची वाडीवऱ्हे येथील एका कंपनीत ओळख झाली होती.तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते.कालांतराने सुरज सोलंकी हा साधनाला ब्लॅकमेल करून अनैतिक संबंधाची मागणी करू लागला आणि तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. याच गोष्टीचा राग मनात धरून साधना व तिचा पती हनुमंत शिंदे यांनी सुरजला विल्होळी शिवारात बोलावून घेतले आणि झटापट करून कोयत्याने व दगडाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.आरोपींतांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयाने त्यांची२ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांचे पथक करीत आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व विभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखालीस्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पो.नि.श्री.दत्तात्रय शिंदे,स.पो.नि. नितीन रणदिवे, पो.उ.नि.प्रकाश भालेराव,पो.उ.नि.शैलेश पाटील, स.पो.उ.नि.नवनाथ सानप,पो.ह.प्रवीण काकड, संदीप नागपुरे,रावसाहेब कांबळे,हेमंत गिलबिले, धनंजय शिलावट,प्रदीप बहिरम,संतोष दोंदे, किशोर बोडके, नितीन गांगुर्डे,म.पो.ह. ललिता शिरसाठ,अस्मिता मढवई.नाशिक तालुका पोलीस पो.ह. निलेश मराठे,शितल गायकवाड,अनिल मुरडनर,प्रकाश वाजे,मंगेश पानझडे.यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी