कळवण नांदुरी रोड अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी गुन्हा दाखल

कळवण :- दि.15/04/2026 रोजी कळवण ते नांदुरी जाणारे रोडवर गोबापुर शिवार विट भट्टी जवळ ठिकाणी,यातील सागर मगनलाल गांगुर्डे राहणार आंबे,आरोपीताने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची मॅक्सिमो गाडी (क्र. MH-41 AM-0733) ही कळवण बाजूकडून नांदुरी बाजूकडे चालवत नेत असताना, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्याने ही गाडी हयगयीने, अविचारीपणे आणि भरधाव वेगात चालवून समोरून जाणाऱ्या मालवाहू कंटेनरला (क्र. MH-43 BP-2740) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.

त्याच वेळी समोरून (नांदुरी बाजूकडून कळवण बाजूकडे) येणारी फिर्यादी किसन बबन चौरे रा दहेगाव मनमाड यांचा चुलत भाऊ मयत गणेश वाल्मिक चौरे (रा. भुषणी, ता. कळवण) यांच्या मोटारसायकलला (क्र. MH-41 AJ-1759) डाव्या बाजूने जोराची धडक दिली.यामधे गाडीचे मोठे नुकसान तसेच जीवितहानी
या भीषण अपघातात मोटारसायकल स्वार गणेश वाल्मिक चौरे यांच्या डोक्याला, तोंडाला आणि मानेला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली त्यांची बहीण दीपाली वाल्मिक चौरे,आणि मित्र पार्थ महिपत साबळे (दोघे रा. भुषणी, ता. कळवण) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.उशिराचे गुन्हा दाखल होण्याचे कारण मोटार अपघात रजिस्टर नंबर ०४/२०२६ च्या प्राथमिक चौकशीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास अंमलदार पोलीस हवालदार ३३ बागुल, नेमणूक - कळवण पोलीस स्टेशन करीत आहेत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी