जागतिक लिव्हर दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा जनजागृती उपक्रम
नाशिक :- जागतिक लिव्हर दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे लिव्हरच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. यावर्षी “Solid Habits, Strong Liver” या संकल्पनेवर भर देत नागरिकांना निरोगी सवयी अंगीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चार महत्त्वाचे स्तंभ (Four Solid Habits) अधोरेखित करण्यात आले—
संतुलित आहार (Balanced Diet), नियमित शारीरिक हालचाल (Physical Activity), मद्यपानाचे मर्यादित सेवन (Reduced Alcohol Intake) आणि नियमित आरोग्य तपासणी (Regular Check-ups).
तज्ज्ञांनी सांगितले की, या चार सवयींचा अंगीकार केल्यास लिव्हरशी संबंधित अनेक आजार प्रभावीपणे टाळता येऊ शकतात.
याबाबत बोलताना गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील म्हणाले,
“लिव्हर हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव असून तो पचनक्रिया, विषारी घटकांचे निर्मूलन आणि शरीरातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली यांच्या माध्यमातून लिव्हरची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.”डॉ.सोहम दोशी यांनी सांगितले,
“लिव्हरचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात बहुतांश वेळा लक्षणांशिवाय वाढतात. त्यामुळे नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यासाठी फायब्रोस्कॅन (Fibroscan) ही आधुनिक, नॉन-इनवेसिव्ह तपासणी उपयुक्त ठरते, ज्याद्वारे लिव्हरमधील फॅट आणि फायब्रोसिस अचूकपणे ओळखता येते.”असे डॉ.अमोल शिंदे यांनी नमूद केले,“आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हर आणि इतर लिव्हर विकार वाढताना दिसत आहेत. अनियमित आहार, जंक फूड, मद्यपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे त्यामागील मुख्य कारणे आहेत. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी सवयी अंगीकारल्यास हे आजार मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.”यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.अमोल जाधव म्हणाले,“लिव्हर सिरोसिस हा गंभीर आजार असून,त्याच्या उशिरा टप्प्यात लिव्हर ट्रान्सप्लांटची आवश्यकता भासू शकते. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी तज्ज्ञांची टीम उपलब्ध आहे, ज्यामुळे रुग्णांना नाशिकमध्येच उच्च दर्जाचे उपचार मिळू शकतात.”वरिष्ठ GI सर्जन डॉ.संदीप सबनीस यांनी सांगितले,“गत काही वर्षांत जीवनशैलीतील बदलांमुळे नॉन-कम्युनिकेबल आजार विशेषतः फॅटी लिव्हर,लिव्हर सिरोसिस आणि मेटाबॉलिक विकारांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे लवकर निदान,योग्य उपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा अत्यंत आवश्यक आहेत.तज्ज्ञांनी यावेळी हेपॅटायटिस B या लिव्हरला प्रभावित करणाऱ्या संसर्गजन्य आजाराबाबतही जनजागृती केली. हा आजार रक्त किंवा शारीरिक द्रव्यांद्वारे पसरू शकतो. योग्य लसीकरण (Vaccination), सुरक्षित वैद्यकीय पद्धती आणि नियमित तपासणी यांच्या माध्यमातून हेपॅटायटिस B टाळता येऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,“जागतिक लिव्हर दिनाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये लिव्हरच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून लिव्हरशी संबंधित सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत.तसेच,आता लिव्हर ट्रान्सप्लांटसारख्या प्रगत शस्त्रक्रियांसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज नसून, नाशिकमध्येच या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमची तज्ज्ञ टीम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सज्ज आहे.”
जागतिक लिव्हर दिनानिमित्त नागरिकांनी नियमित तपासणी करून घ्यावी, संतुलित आहार व निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा तसेच लसीकरणाद्वारे हेपॅटायटिससारख्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करावे,असे आवाहन करण्यात आले.या अनुषंगाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये जागतिक लिव्हर दिनानिमित्त कॉम्प्रिहेन्सिव्ह लिव्हर स्क्रिनिंग पॅकेज अवघ्या ₹२००० मध्ये सुरू करण्यात आले आहे.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हर व पचनसंस्थेच्या आजारांचे अचूक निदान व प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा