वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

दिंडोरी :- जि.प.शाळा,तळेगाव येथे शालेय साहित्याचे दि.17 एप्रिल 2026 रोजी जि.प.शाळा,तळेगाव, ता.दिंडोरी येथे राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तुला केलेल्या वह्यांचे वाटप डी एस एफ यांचे वतीने करण्यात आले.सरपंच सोनाली चारोस्कर,अशोक दुधारे,अशोक कदम, दीपक निकम,ज्योती निकम,अविनाश ढोली,विजया दुधारे,माजी सरपंच अजय चारोस्कर,यांचे हस्ते 160 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध झाडांच्या बियांचे संकलन करण्यात आले.जमा केलेल्या बियांचे रोपण करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कांतीलाल भरसट, शाळेतील शिक्षक धनंजय आहेर,अशोक देवरे,पुष्पा जगताप,कुंदा निकम,माधुरी थोरात,ज्योती अहिरे,पल्लवी गांगोडे,रोहिणी परदेशी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी