या सायबर गुन्हे कक्षात एकावेळी सुमारे पन्नास व्यक्ती बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे जनजागृती कक्षाचा उद्देश हा सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे घडत असल्याने लोकांमध्ये जनजागृती होऊन सायबर गुन्ह्यांचा प्रतिब़ंध व्हावा यासाठी आहे.
या उपक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थी यांच्यापासून करण्यात आली.यावेळी अभिनव सांस्कृतिक मंडळ संचलित आदर्श विद्यालय येथील शिक्षक चेतन राजपूत, शिक्षीका भाग्याश्री बोरसे, विद्यार्थी विद्यार्थिनी असे पन्नास जण उपस्थित होते.कार्यक्रमास उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांना मालेगाव कॅम्प येथील सह,पोनी पंकज निकम,पोउप नि.विजया पवार,यांनी सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी काय काळजी घ्यावी सायबर गुन्हा घडून फसवणूक झाल्यास काय उपाययोजना करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.यापुढे जनजागृती कक्षात वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कार्यक्रमास पो हवा रुपचंद पारधी, राजपूत,आहिरे,माळी,पो शि.लखन पवार,शेख,म पो शि सोनवणे आदींनी सहभाग घेतला.
0 टिप्पण्या