पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जवानांचे मनोबल वाढणार! माओवादाविरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष सन्मान

इमेज
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद मुंबई,दि.30 :- माओवादाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश मिळविले आहे. आता माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली आहे. त्यामुळे किमान तीन वर्षे सी-60 मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-60 पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक कार्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद झाली.या परिषदेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल,गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच भारतीय पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.गडचिरोलीसारख्या भागात आता विकासाचे नवे चित्र उभे राहत असून लोकशाहीची मुळे बळकट होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,माओवादाची चळवळ राज्यात नगण्य पातळीवर आली असून आता तिच्या पुनरुज्जीवनाला आळा घालणे हे पुढील मोठे आव्हान आहे. या संघर्षात 244 पोलीस कर्मचारी शहीद झाले, तर 609 नागरिका...

नाशिक महानगरपालिका,सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी पुरवठा जाहिर निवेदन

इमेज
नाशिक :- संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ प्राधान्य विषयक मोठया स्वरुपाची महत्वाची व अत्यावश्यक कामे तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार दि. ०४ व रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसांचा शट डाऊन घेण्याचे नियोजित असुन या दोन दिवस संपूर्ण नाशिक शहरात खालील नमूद परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. तरी शहरातील सर्व नागरीकांनी मनपास सहकार्य करावे.संपुर्ण नाशिक शहरात दोन दिवसांचा शट डाऊन कालावधीमध्ये विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार असुन मक्तेदार व कामाचा कालावधी देण्यात आलेला आहे. नाशिक पुर्व विभाग १) नाशिक पुर्व प्र.क्र. ३० मधील कलानगर जलकुंभ भरणारी ५०० मी.मी. व्यासाची गुरुत्व वाहीनी मुख्य ७०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहीनीला जोडणे मक्तेदार मेघ कंस्ट्रुवेल कालावधी अंदाजे २४ तास २) गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र लक्ष्मी सिव्हील इंजिनिअर नाशिक पश्चिम विभाग १) त्र्यंबक रोड एबीबी सर्कल येथे मोठया प्रमाणत असलेले ३०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन लिकेजचे काम बंद करणे      २) पी ॲन्ड टी कॉलनी येथे २०० मी.मी. व्यासाचा ए...

नगरसचिवांसह सोळा अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेतून सेवानिवृत्त

इमेज
(प्रतिनीधी समाधान शिरसाठ) नाशिक,दि.३०:- महानगरपालिकेच्या सेवेतून मनपाचे नगरसचिव मदन हरिश्चंद्र यांच्यासह १६ अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.नाशिक महानगरपालिकेच्या सेवेत नगरसचिव या पदावर कार्यरत असणारे जेष्ठ मदन हरिश्चंद्र हे ३७ वर्षाच्या मनपा सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,यांच्या हस्ते मनपा पदाधिकारी,गटनेते,नगरसेवक व अधिकारी यांच्या उपस्थितीत महासभेत करण्यात आला.कामगार कल्याण विभागाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे मार्च २०२६ मध्ये सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापुर्ती सत्कार मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे करण्यात आला. नाशिक महानगरपालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले राजाराम जाधव,विभागीय अधिकारी मनोहर पगारे,बिगारी,वसंत वाघ, कामाठी,संजय हिरवे,शिपाई,संतोष खर्डे,स्वच्छता मुकादम,श्रीमती देवलबेल वाघेला,सफाई कर्मचारी, ज्ञानेश्वर पव...

निधन वार्ता

इमेज
इंदिरानगर :- येथील वनवैभव कॉलनीतील राहिवाशी सुशीला जयराम काठे(वय 82) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलं,एक मुलगी,जावई,सुना,नातू,पणतू असा परिवार आहे.त्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ याच्या मामी व हॉटेल मामा का ढाबाचे संचालक मंगेश काठे व संजय काठे याच्या मातोश्री होत्या.

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत १५११ असाक्षर व्यक्तींच्या सहभाग

इमेज
नाशिक :- केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर पार पडल्या.त्यात १५११ असाक्षर व्यक्तींनी सहभाग नोंदविला.केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत रविवार,दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.००ते दुपारी ५.०० या वेळेत मनपा क्षेत्रातील २२४ परीक्षा केंद्रांवर असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLNAT) चाचणी घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण १५११ असाक्षर व्यक्ती सहभागी झाल्या असून,ही महत्त्वपूर्ण चाचणी आयोजित करण्यात आली आहे.या परीक्षा केंद्रावर २२४ केंद्रसंचालक यांची नेमणूक करण्यात आलेली होती.तसेच वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी यांच्या मार्फत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या आहे.मनपा प्रशासनाच्या वतीने व मनपा प्राथमिक व माध्यमिक तसेच खाजगी विविध शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहभागातून ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमातून असाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे. डॉ. मिता चौधरी - प्रशासनाधिकारी म...

प्रशासनात पारदर्शकतेचा नवा अध्याय! मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला 'त्रिसूत्री'चा मंत्र

इमेज
प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागांचा गौरव मुंबई, दि. २८ : राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.सह्याद्री अतिथिगृह येथे ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या उत्कृष्ट कार्यालय प्रमुखांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञान तथा संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह सर्व मंत्रालय विभागांचे अपर मुख्य ...

महाराष्ट्रात आता उद्योगांची चांदी! परवानग्या होणार सुलभ आणि वीजदरही घटणार; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

इमेज
उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 28 :- महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रामकी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बल्क ड्रग पार्क’ व ‘लाइफ सायन्सेस हब’उभारण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री माधुरी मिसाळ,उद्योग प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन,वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योजकांना विश्वासपूर्वक सांगितले की,राज्यातील वीजदर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहेत.सध्या असलेला ₹10.88 प्रति युनिट हा वीजद...

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.२७ :- जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते.त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने मुद्दे मांडले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे ना...

लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

इमेज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू  मुंबई :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.महायुती सरकारचा दृढ निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.   मंत्री अदिती तटकरे  महिला बालविकास 

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

इमेज
पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे - कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक,दि.26मार्च2026 :- जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, तेल कंपन्या व वितरकांनी समन्वयाने कार्य करावे. कोणत्याही आफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अनावश्यक गर्दी व इंधन साठेबाजी टाळून संयम बाळगावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडर वितरक,कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंत्री महाजन बोलत होते.यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्यासह विविध तेल कंपन्या,गॅस वितरक यांचे प्रतिनिधी,अधिकारी उपस्थित होते.मंत्री महाजन म्हणाले की,सध्या पेट्रोल-डिझेलची मागणी दीडपट वाढल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती कृत्रिम टंचाईची परिस्थि...

वाडीवऱ्हे बजाज इलेक्ट्रॉनिक्स कामगार प्रश्न मार्गी लागणार? कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचे ३१ मार्चपर्यंतचे मोठे निर्देश!

इमेज
मुंबई, दि. २४ :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे येथील मे.बजाज इलेक्ट्रॉनिक्स लि. मधील कामगारांच्या स्वेच्छानिवृत्ती प्रकरणाचा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आढावा घेतला.कामगारांवर अन्याय होऊ नये,यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.कंपनी प्रशासन व कामगार प्रतिनिधींनी आपले लेखी म्हणणे ३१ मार्चपर्यंत सादर करावे, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बैठकीत दिले.फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती.संबंधित कामगारांकडून सक्ती झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून,व्यवस्थापनाने सध्याच्या परिस्थितीत मूळ पदांवर काम उपलब्ध नसल्याने पर्यायी स्वरूपात इतरत्र काम देण्याची तयारी दर्शविली आहे.कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असून, सर्व बाबींचा विचार करून न्याय्य निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आकाश फुंडकर यांनी नमूद केले.बैठकीस आमदार सीमाताई हिरे, प्रधान सचिव आय ए कुंदन, कामगार आयुक्त डॉ एच पी तुम्मोड तसेच संबंधित अधिकारी,कामगार प्रतिनिधी आणि कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब...

येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी आ. पंकज भुजबळ यांचा तारांकित प्रश्न

इमेज
येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांची दुरुस्तीची कामे लवकर हाती घेण्यात येतील आमदार पंकज भुजबळ यांच्या तारांकित प्रश्नावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधान परिषदेमध्ये आश्वासन येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांची दुरुस्तीच्या कामाबाबत आ.पंकज भुजबळ यांच्यावतीने प्रश्न उपस्थित विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे मुंबई, दि.२४मार्च :- येवला तालुक्यातील खिर्डीसाठे,डोंगरगाव व खडकओझर लघुपाटबंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून ही कामे लवकरच हाती घेण्यात येतील,अशी माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या विधानपरिषदेच्या सभागृहात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.येवला तालुक्यातील अतिशय जुने असलेल्या खिर्डीसाठे,डोंगरगाव आणि चांदवड तालुक्यातील खडकओझर लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्ती बाबत आमदार पंकज भुजबळ यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, खिर्डीसाठे, डोंगरगाव आणि खडकओझर लघुपाटबंध...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

इमेज
मुंबई, दि. २३ :- महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे.‘राजमाता जिजाऊ’या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते,तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २४ मार्च २०२६ रोजी विधिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे.या सोहळ्यास विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.मंत्री सरनाईक म्हणाले की,‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे.लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल तीन हजार‘राजमाता जिजाऊ’या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या ...

सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
‘गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर’चा लोकार्पण सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या आरोग्य सेवेचा शुभारंभ नागपूर दि. २२ :-अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाज सेवेला प्राधान्य देऊन लोकसेवक म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाने सुरू झालेल्या नव्या आरोग्य सेवेचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला,या सेवा प्रकल्पातून सर्वसामान्य जनतेला परवडतील अशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.सोमलवाडा परिसरात श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन तर्फे अत्याधुनिक सुविधायुक्त गंगाधरराव फडणवीस डायग्नोसिस सेंटर उभारण्यात आले असून या सेवेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता, सर्वसामान्यांना अत्याधुनिक सुविधांचा लाभ परवडेल अशा दरात उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.लोकार्पण सोहळ्यास सरिता गंगाधर फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती तसे...

राज्यातील हॉटेल,उपहारगृहांसाठी आता २० टक्के अतिरिक्त गॅस पुरवठा होणार - मंत्री छगन भुजबळ

इमेज
हाॅटेल व्यवसाय एलपीजी गॅस पुरवठा बाबत मंत्री छगन भुजबळ यांची माहिती व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करावे राज्यातील हॉटेल, ढाबे,उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टीन,अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय,राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टीन,कम्युनिटी किचन्स यांच्यासाठी २० टक्के एलपीजी पुरवठा करण्याचे केंद्राचे निर्देश असल्याची अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली माहिती. व्यापारी एलपीजीच्या (Commercial LPG) वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा-मंत्री छगन भुजबळ मुंबई,दि.२२मार्च २०२६ :- राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया-दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी (Commercial LPG) पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिनांक २१ मार्च २०२६ रोजी द...

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा संकल्प रायगड, दि. २०:- महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समता,सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड (रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला. या शताब्दी वर्ष कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,उद्योग व मराठी भाष...

पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत - पालकमंत्री नितेश राणे

इमेज
पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते पोलीस दलासाठी अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार  –  राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर २८ वाहने पोलिसांच्या ताफ्यात दाखल सिंधुदुर्ग ऑफिसर्स असोसिएशनची स्थापना सिंधुदुर्गनगरी , दि.१९ :-  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वाटावे, यासाठी पोलिसांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचा मजबूत आधार आहे. त्यामुळे त्यांना आधुनिक साधने आणि सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २८ अत्याधुनिक वाहने देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे गुन्हे रोखणे, तपास करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. यापुढेही पोलीस दल अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. जिल्हा पोलीस दल अधिक सक्षम व आधुनिक बनविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालकमंत्री नितेश राणे व गृह ...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकच्या सर्जिकल विभागात 4K, 3D आणि ICG तंत्रज्ञानासह अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी प्रणालीची भर

इमेज
अशोका मेडिकव्हर सर्जिकल विभागात 4K,3D ICG तंत्रज्ञानासह अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक सर्जरी प्रणाली विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे (प्रतिनधी समाधान शिरसाठ) नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकच्या सर्जिकल विभागात रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक 4K, 3D आणि ICG (Indocyanine Green) तंत्रज्ञानावर आधारित लॅप्रोस्कोपिक सर्जरी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातील सूक्ष्म रचना अधिक स्पष्ट, त्रिमितीय (3D) स्वरूपात आणि अचूकपणे पाहता येतात,ज्यामुळे शस्त्रक्रियेची गुणवत्ता आणि सुरक्षितता लक्षणीयरीत्या वाढते.सर्जिकल विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन डॉ.संदीप सबनीस,यांच्या नेतृत्वाखाली ही प्रणाली कार्यरत राहणार असून, त्यांच्या सर्जिकल टीममध्ये डॉ. प्रखर गुप्ता आणि डॉ. उर्विक पटेल यांचा समावेश आहे. अनुभवी टीम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या समन्वयामुळे रुग्णांना अधिक परिणामकारक आणि विश्वासार्ह उपचार मिळणार आहेत.या प्रणालीतील 4K तंत्रज...

कोकणातील नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांना अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मदत जाहीर करण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात बैठक मुंबई,दि.१७:- आंबा व काजू हे कोकणची ओळख आहे. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या आंबा व काजू फळ पिकाचा मोहोळ गळून पडल्यामुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबा व काजू प्रश्नाबाबत विधानभवनात आयोजित बैठकीत सांगितले.बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे,उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत,कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,गृह राज्यमंत्री योगेश कदम,खासदार सुनील तटकरे,आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर,दीपक केसरकर,भास्कर जाधव,महेंद्र दळवी,निलेश राणे,राजेंद्र गावित, प्रसाद लाड, किरण सामंत,ज्ञानेश्वर म्हात्रे मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल आदी उपस्थित होते.तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे यांनी ब...

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा; माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक मुंबई,दि.१७:- नागरिकांसाठी भयमुक्त वातावरण राहता यावे यासाठी राज्यात सुरक्षित व गुन्हेमुक्त शहरे करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. यासाठी राज्य शासन आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत असून सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे मजबूत करण्याचादेखील समावेश आहे. येत्या काळात सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे जाळे मजबूत करून प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.माहिती व तंत्रज्ञान विभागाने गृह,नगरविकास विभागाच्या समन्वयातून सीसीटीव्ही यंत्रणेच्या प्रभावी उपयोगासाठी,शहरांमधील खासगी सीसीटीव्ही डेटाचा गुन्हे तपासासाठी उपयोग करणे आणि शूटिंग बुद्धिमत्तेवर आधारित सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी महामंडळाची निर्मिती करावी,अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.विधानभवन येथे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,माहिती व तंत्रज्ञ...

जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
विधानभवन येथे जल प्रवासी वाहतुकीसंदर्भात आढावा बैठक मुंबई, दि.१७ :- “मुंबई महानगर प्रदेशात जल प्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून यादृष्टीने शिपयार्ड विकसित करण्यासाठी जागा निश्चिती केली जावी. जलप्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बोटींची बांधणी यातून होऊ शकेल”, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथे जलवाहतूक संदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली सुरू झाली.बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे,अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह महाराष्ट्र सागरी मंडळाचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी.उपस्थित होते. जल प्रवासी वाहतुकीसाठी बोटीची बांधणी राज्यातील शिपयार्डमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील सर्वात मोठी शिपयार्ड सुविधा विकसित करताना त्यावर आधारित सुनियोजित विकास करण्यासाठी कार्यवाही करताना गुणवत्तेची कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या.“जल प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बोटीची बांधणी आपल्याच शिपयार्डमध्ये व्हावी.दुसऱ्या फेजमध्ये यावर कार्यवाही होण्यासाठी प...

भारतासह सहा मित्र देशांमधील सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट

इमेज
मुंबई,दि.१७:- नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेत असलेल्या भारत व सहा मित्र देशातील वरिष्ठ सैन्य दल व नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या एका १७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.शिष्टमंडळामध्ये भारतीय नौदल,वायुदल व स्थलसेनेतील ब्रिगेडियर दर्जाचे अधिकारी तसेच राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय रशिया,ओमान,इंडोनेशिया, नायजेरिया,नेपाळ व टांझानिया या मित्र देशांचे वरिष्ठ सैन्य अधिकारी देखील उपस्थित होते. नॅशनल डिफेन्स कॉलेज येथील वरिष्ठ सल्लागार मेजर जनरल हरकिरत सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ सध्या मुंबई व पुणे येथे अभ्यास दौऱ्यावर आले आहे.

विद्यापीठांनी ‘स्कूल - कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी‘स्वयंसिद्धा’उपक्रम कसोशीने राबवावेत - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

इमेज
अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना मुंबई,दि.१७:- राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी मंगळवारी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंशी लोकभवन, मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. विद्यापीठांनी आपले राष्ट्रीय मानांकन सुधरावे व त्यासाठी वेळोवेळी लक्ष निर्धारित करावे,अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली.राज्यातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी या दृष्टीने विद्यापीठांनी शाळा – शाळांशी संपर्क वाढवावा व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करावे.या दृष्टीने ‘स्कुल – कनेक्ट’ या कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे,अशी महत्वाची सूचना राज्यपालांनी केली.हा कार्यक्रम राबवताना नवीनता व चाकोरीबाहेरच्या संकल्पना रुजू कराव्या असेही राज्यपालांनी सांगितले.महिला सक्षमीकरण तसेच कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून महिलांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी सुरु केलेला ‘स्वयंसिद्धा’हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण असून तो देखील विद्यापीठ...

क्रांतीकारक राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे छायाचित्र लावण्याची मागणी

इमेज
नाशिक :- नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव,मातंग समाज बांधवांच्या वतीने वेळोवेळी नाशिक महापालिका सभागृहात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे,भगवान बिरसा मुंडा तसेच लोकशाहिर अण्णाभाऊ साठे,यांचे छायाचित्र लावण्याची मागणी पुढे येत होती त्याच अनुषंगाने आज महापौर हिमगौरी आहेर आडके यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विशाल माळेकर,नगरसेविका रुपाली निकुळे मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सोमनाथ खाणे,विशाल मोरे,राहुल तारडे,परवेज शेख, यांच्यासह आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
पुणे 'मेट्रो भवन'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली.पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सु...

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई,दि.१५मार्च :- राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका आहे. ‘एज्युकेट गर्ल्स’सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे राज्य मुक्त शाळा प्रणाली अधिक बळकट होईल आणि शिक्षण अर्धवट राहिलेल्या विशेषतः मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी मिळेल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.राज्यातील मुक्त शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि औपचारिक शिक्षण प्रणालीमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने शालेय शिक्षण विभागाने ‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेशी नुकताच सामंजस्य करार केला आहे.राज्यात प्रत्येकाला शालेय शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम आग्रही आहेत. यादृष्टीने शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थांना देखील नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे.पूर्व प्...