घुसघोर रोहिंग्या बांग्लादेशींवर कडक कारवाई करावी - मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई :- बांग्लादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी ही मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे.खोटे आधार कार्ड घेऊन हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत,फेरीवाले,भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण मुंबई काबीज करतील. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गिरगाव मधील अशाच ८ घुसखोरांची खोटे आधार कार्ड जप्त केले.आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा, यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती,यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी त्यांनी माहिती दिली की,मालवणी परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.यात नऊ हजार चौरस मीटर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे.मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे आढळून आले आहेत.कायदेशीर करवाई झाली असून सुद्धा पाडलेल्या झोपड्या पुन्हा पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात उभ्या करण्याची तयारी येथे सुरु झाली आहे.अधिक तपास करून पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी,अशी मागणी देखील लोढा यांच्या वतीने यावेळी करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा