नाशिक :- अंगणवाडी व शाळांमध्ये सुरक्षित, पोषणमूल्ययुक्त अन्न सुनिश्चित करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या सूचना नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना देण्यात येणारे अन्न सुरक्षित,स्वच्छ व पोषणमूल्ययुक्त असावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 21 अंतर्गत प्रत्येक व्यक्तीस सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार असून त्यामध्ये आरोग्य व पोषणाचा अधिकार समाविष्ट आहे. बालकांच्या आरोग्यावर असुरक्षित व पोषणमूल्यहीन अन्नाचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांना सुरक्षित व संतुलित आहार मिळणे आवश्यक आहे.
प्रमुख सूचना
1. अंगणवाडीतील आहाराची गुणवत्ता तपासणी अंगणवाडी केंद्रांना महिला बचतगट, महिला मंडळे किंवा महिला संस्थांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता व पोषणमूल्य तपासण्यात येणार आहे.2. अन्नाची स्वच्छता व सुरक्षितता अंगणवाडी परिसरात तसेच शाळांच्या आसपास विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छता व सुरक्षिततेबाबत आवश्यक तपासणी करण्यात येणार आहे. 3. HFSS अन्नपदार्थांवर निर्बंध शाळेच्या परिसरात किंवा शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटर अंतराच्या क्षेत्रात मुलांना HFSS (High Fat, Sugar and Salt) अन्नपदार्थांची जाहिरात, विपणन, विक्री किंवा विक्रीसाठी मांडणी अथवा मोफत वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.
4. नियमित तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी करण्यात येईल.तसेच आरोग्य व स्वच्छता दूत किंवा त्यांच्या टीममधील नोडल व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे.
5. खाद्यपदार्थ विक्रेत्यांची माहिती अंगणवाडी व शाळांच्या आसपासच्या 50 मीटर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर संबंधित व्यावसायिकांची यादी तयार करून सार्वजनिक आरोग्य विभागास माहिती देण्यात येणार आहे.नागरिकांना आवाहन
पालक,शिक्षक,अंगणवाडी सेविका,महिला बचतगट, खाद्यपदार्थ विक्रेते आणि नागरिकांनी बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित,स्वच्छ व पोषणमूल्ययुक्त अन्नाला प्राधान्य द्यावे.शाळा व अंगणवाडी परिसरात नियमांचे पालन करून बालकांसाठी सुरक्षित अन्नपरिसर निर्माण करण्यास सहकार्य करावे.
0 टिप्पण्या