नाशिक:- परभणी येथे दिनांक 21 ते 23 ऑगस्ट 2026 च्या दरम्यान सुरू असलेल्या 7 व्या चाईल्ड (१० वर्षातील ) व 18 व्या मिनी( 12 वर्षातील) स्पर्धेत नाशिकच्या खेळाडू दुसऱ्या दिवशी एक सुवर्ण चार कास्य पदके पटकावली. 12 वर्षातील फाईल प्रकारात प्रणव डेरले याने सुवर्णपदक पटकाविले तर शौर्य यादव याने कास्यपदक पटकाविले. फॉईल मुलींमध्ये अनन्या सुळे हीने कास्यपदक पटकाविले बारा वर्षा आतील इपी मुलींमध्ये रेवा पाटील हिने कांस्यपदक पटकाविले.दहा वर्षातील मुलींमध्ये फाईल प्रकारात श्रेया डेरले हिने कास्यपदक पटकाविले सर्व खेळाडूंना राजू शिंदे,जय शर्मा,राहुल फाडोळ,प्रसाद परदेशी,यांचे मार्गदर्शन मिळत आहे.स्पर्धेच्या पारितोषिक वितरण फेन्सिंग असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष अशोक दुधारे छत्रपती पुरस्कार प्राप्त, प्रकाश काटूळे,शेषनारायण लोढे, राजकुमार सोमवंशी राजू शिंदे, यांच्या हस्ते पार पडला.वरील सर्वांना अभिनंदन जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटील,खजिनदार दीपक निकम,अण्णा पाटील इत्यादींनी केले आहे.
0 टिप्पण्या