अग्निशमन विभागाच्या वतीने जनजागृती रॅली आयोजन शहीदांना श्रद्धांजली
नाशिक :- मनपाच्या वतीने अग्निशमन व आपत्कालीन सेवा सप्ताह २०२६ निमित्त सोमवार दि.२० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता अग्निशमन विभागाच्या वतीने नाशिक शहरातून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.दि.१४ एप्रील १९४४ रोजी मुंबई मधील गोदीत एस. एस. पोर्ट स्टिकीन या जहाजाला स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीशी झुंझ देतांना मुंबई व इतर अग्निशमन दलाचे ६६ जवान हुतात्मा झाले.तसेच त्यानंतरही अग्निशमनाचे कार्य करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निशमन सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १४ एप्रिल या दिवशी श्रध्दांजली वाहून जनतेमध्ये अग्निशमन बाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रतीवर्षी केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली यांच्या सुचनेनुसार सपूर्ण देशात दि.१४ ते दि. २० एप्रिल या कालावधीत "अग्निशमन सेवा सप्ताह" पाळला जातो.
शहीद जवानांना श्रध्दांजली
या अनुशंगाने नाशिक महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाकडून दिनांक १४ एप्रिल रोजी पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र येथे शहीद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.त्यामध्ये नाशिक महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाकडील जे जवान आगीशी झुंज देतांना शहीद झाले अशा जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांचे सह विभागातील अधिकारी,सर्व कर्मचारी उपस्थित होते.मॉकड्रीलचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि.१४ ते दि.२० एप्रील २०२६ या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.अग्निशमन विभागामार्फत नाशिक शहरातील ६ विभागामधील उंच रहिवाशी इमारती,व्यवसायिक इमारती, हॉस्पिटल, हॉटेल,शाळा अशा निश्चित केलेल्या ठिकाणी दि.१४ ते दि.२० एप्रील २०२६ या कालावधीत अग्निशमन विभागाची नागरीकांमध्ये सतर्कता व जनजागृती व्हावी या दृष्टीकोनातून मॉकड्रीलचे आयोजन करणेत आले आहे.अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त दि.२० एप्रिल २६ रोजी दुपारी ४.०० वा.अग्निशमन विभागाची जनजागृती रॅली नाशिक शहरातून दुधबाजार, मेनरोड, रविवार कारंजा,शालिमार,या ठिकाणी काढून आगीपासून निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजना याबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणेत येत आहे. तसेच सहा मनपा विभागीय कार्यालये,मनपा हॉस्पिटल, राजीव गांधी भवन, सिटो सेंटर मॉल इ.गरजेच्या ठिकाणी जनजागृतीपर माहिती फलक लावणेत आले.
महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,मनपा गटनेते, पदाधिकारी,नगरसेवक,अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे,यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभागाकडील अधिकारी,कर्मचारी शहरामध्ये जनजागृती म्हणून प्रत्येक विभागामधे मांकड्रीलचे नियोजन करुन आग लागू नये म्हणुन घ्यावयाची काळजी,याबाबत व्याख्याने,प्रात्यक्षिके व शहीद जवानांच्या परिवारासाठी २० एप्रिल रोजी शहरा मधुन फेरी काढून निधी संकलन करणेत येणार आहे.दिनांक १४ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत जनजागृती करुन शहरामध्ये अग्निशमन सेवा सप्ताह पाळला जात आहे.
अग्निशमन दल नागरीकांच्या जीविताचे व मालमत्तेच्या संरक्षणासाठी आहोरात्र २४ तास सज्ज असून आग अपघात प्रंसगो अग्निशमन दलास त्वरीत संपर्क करण्यासाठी प्रत्येक विभागातील संपर्क क्रमांक खालील प्रमाणे.
१).मुख्य अग्निशमन केंद्र फोन नं. १०१/०२५३-२५९०८७१.
२).पंचवटी अग्निशमन केंद्र फोन नं. ०२५३-२५१२९१९
३) पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्र फोन नं. ०२५३-२६२९१०४
४)सातपुर अग्निशमन केंद्र फोन नंबर. ०२५३-२३५०५००
५)नविन नाशिक अग्निशमन केंद्र फोन नं. ०२५३-२३९३९६१
६)नाशिक रोड अग्निशमन केंद्र फोन नं. ०२५३-२४६१३७९
७)आपत्ती व्यवस्थापन कक्ष, राजीव गांधी भवन फोन नं. ०२५३-२२२२४१३/२५७१८७२
घोषवाक्य एकत्रपणे" "सुरक्षित शाळा, सुरक्षित रुग्णालय आणि अग्नि सुरक्षिततेसाठी जागरुक समाज आग प्रतिबंधकतेसाठी नाशिक महानगरपालिका अग्निशमन दलातर्फे नाशिक शहरातील सर्व नागरीकांना जाहीर आवाहन करण्यात येते की,अग्निशमन विभागाने केलेल्या आवाहनानुसार अग्निशमन सेवा सप्ताह प्रभावीपणे पाळून आगी पासून निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी घ्यावयाची दक्षता व त्यावरील उपाययोजना याबाबत सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी नाशिक महानगरपालिका,नाशिक
संजय बैरागी यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा