नाशिक :- नाशिक महानगर परिवहन महामंडळ(सिटी लिंक) कार्यलयास भेट देऊन जयभवानी रोड येथे दोन बस स्टॉप ची उभारणी भालेराव मळा,कदम मळा येथे तसेच श्रावण मास निमित्त नाशिकरोड ते जयभवानी रोड मार्गे ,द्वारका ,त्र्यंबकेश्वर बस फेरी भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावी ,याकरिता सिंटिलिंकचे व्यवस्थापक मिंलिद बंड यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने युवतीसेना उपजिल्हाधिकारी सौ.योगिता किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.याप्रसंगी व्यवस्थापकांनी चर्चा करण्यात आली. अतुल धोंगडे, शिवा धोंगडे,संकेत औशिकर ,प्रतिक जाचक ,सुर्वणा कांळुगे, घोलप ताई ,पुष्पा वाकचौरे, आदी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या